सिटी युनियन बँकेत भारतातला पहिला बँकींग रोबो

bank
गुरूवारी कुंभकोणम येथील सिटी युनियन बँकेत भारतातील पहिला बँकींग रोबो कार्यरत करण्यात आला आहे. या रोबोचे नामकरण लक्ष्मी असे करण्यात आले आहे. एचडीएफसी बँकेने ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी रोबोचा वापर करण्याचा प्रयोग केला होता असेही समजते.

सिटी युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ एन कामाकोडी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की हा रोबो तयार करण्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. तो ग्राहकांच्या १२५ हून अधिक बॅकींग संदर्भातली प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. त्यात ग्राहकाची बँकेतील शिल्लक, कर्जावरचे व्याजदर अशा प्रश्नांचा समावेश आहे. हा रोबो बँकीग संदर्भातल्या समस्या व त्यावरचे उपायही सांगू शकतो. सध्या इंग्रजीत ही उत्तरे मिळत आहेत. मात्र या रोबोची भाषा औपचारिक नाही तर तो नेहमीच्या भाषेतच व तशाच हालचाली करून उत्तरे देत आहे.

Leave a Comment