या देशांच्या चलनावर आहेत महिला प्रतिमा

fofo1
भारत व अमेरिका या दोन्ही देशांत महिलांना बरोबरीचा दर्जा दिला जात असल्याचा दावा केला जात असला तरी दोन्ही देशांची चलने पाहिली तर महिलांना बरोबरीचा दर्जा हा खोटा प्रचार असल्याचे लक्षात येईल. भारतीय चलनावर म.गांधींची प्रतिमा आहे तर पाकिस्तानी चलनावर बॅ. जिना आहेत. अमेरिकेतही चलनावर महिला प्रतिमा नाही. मात्र जगात कांही देश असे आहेत की ज्यांनी पूर्वीपासूनच त्यांच्या चलनावर महिलांना स्थान दिले आहे. त्यात प्रथम क्रमांक लागतो सिरीयाचा. सिरियात सध्या युद्ध परिस्थितीमुळे महिलांचे जगणे असुरक्षित बनले असले तरी त्यांच्या ५०० पौंड नोटेवर सिरीया क्वीन जेनोबिया हिची प्रतिमा आहे. या राणीने दुसर्‍या शतकांत रोमनांशी युद्ध केले होते.

ऑस्ट्रेलियातील प्रत्येक नोटेवर एका बाजूला महिलेची प्रतिमा आहे. त्यात राणी एलियाबेथ द्वितीय पासून ते अनेक प्रसिद्ध महिलांचा समावेश आहे. स्वीडनच्या २० क्रोना नोटेवर पहिले नोबेल विजेती सलमा गलेलोर्फ, ५० क्रोनावर सिंगर जेनी लिड तर १०० क्रोनावर अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांच्या प्रतिमा आहेत. इस्त्रायलच्या नोटेवर दोन महिला लेखिकांच्या प्रतिमा आहेत तर न्यूझीलंडच्या २० डॉलर नोटेवर राणी एलिझाबेथ दोन, १० डॉलर नोटेवर कॅट शेफर्ड यांच्या प्रतिमा आहेत.

foto
मेक्सिकोच्या ५०० पेसो नोटेवर म्युरलिस्ट डिएगो रिवेरा याची प्रतिमा आहे व त्याच नोटेवर मागे त्याची पत्नी फरीद काहलो हिची प्रतिमा आहे. २०० पेसो नोटेवर लेखक सीर जुआना इन्स दी ला क्रूझची प्रतिमा आहे. तुर्कस्तानच्या ५० लिराच्या नोटेवर महिला हक्कासाठी लढलेली कादंबरीकार फातमा अलिये नोपुझ ची प्रतिमा विराजमान आहे. फिलिपिन्समध्ये १९८० मधल्या ५००पेसो नोटेवर सिनेटर बेनिग्नो अकुइनो ज्युनिअर याची प्रतिमा होती मात्र १९८३ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर पत्नी कोराजोन अकुइनो ही आशियातली पहिली महिला प्रेसिडेंट बनली व तिचाही फोटो नोटेवर झळकला. अर्जेंटिनाच्या १०० पेसो नोटेवर फर्स्ट लेडी इवा पेरो हिचा तर २० पेसो नोटेवर मॅन्युअला रोस वडीलांच्या फोटोसोबत आहे. मॅन्युएला पोलिटिकल अॅक्टीव्हीस्ट होती.

Leave a Comment