टाटामधील मुख्य कंपन्या हडपण्याच्या प्रयत्नात होते सायरस मिस्त्री !

cyrus-mistry
नवी दिल्ली – सायरस मिस्त्री यांची पदावरून उचलबांगडी करण्यामागचे कारण टाटा सन्सने उघड केले आहे. टाटा सन्सने म्हटले आहे की, टाटा समूहाचा सायरस मिस्त्रीने विश्वासघात केला आहे. मिस्त्री यांच्यावर टाटाने आरोप केला आहे की, ते टाटा समूहातील मुख्य कंपन्या हडपण्याचा प्रयत्न करत होते.

टाटा सन्सने म्हटले आहे की, सायरस मिस्त्रीने याच उद्देश्याने दूसऱ्या प्रतिनिधींना कंपनीपासून वेगळे केले. टाटा समूहातील कंपन्यांपैकी टाटा सन्सचा एकमेव प्रतिनिधी होण्याची मिस्त्री यांनी पूर्ण नियोजित पद्धतीने रणनीती बनविली होती. मागील चार वर्षापासून ते असे प्रयत्न करत होते.

टाटाने आरोप लावला आहे की, मिस्त्री यांनी टाटा सन्सचा अध्यक्ष असताना समूहातील १०० वर्षांची परंपरा व तत्वे खंडीत करण्याचे काम केले. कंपन्या भाग भांडवलधारकांपासून दूर होऊ लागली होत्या. त्यामुळे मिस्त्री यांना हटविण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment