मंकी आर्किड

monkey
जग विविध प्रकारच्या फुलांनी बहरलेले आहे. ही फुलांची निष्पाप दुनिया किती मोठी आहे हे सांगणेही कठीण आहे. विविध रंगाची, विविध वासांची, विविध आकारांची फुले माणसाच्या जीवनात आनंद फुलवितात. पाहताक्षणी माणसाच्या चेहर्‍यावर हसू येईल असे एक सुंदर फूल मंकी आर्किड या नावाने ओळखले जाते. इक्वाडोर, कोलंबिया व पेरू देशातील पहाडी भागात समुद्रसपाटीपासून १ ते २ हजार मीटर उंचीवर हे फूल वर्षभर आढळते कारण ते सदाबहार आहे. या फुलाचे वैज्ञानिक नांव ड्रॅकुला सिमिया असे आहे.

या फुलाचे फोटो पाहिले तर कदाचित फोटो शॉपची ही किमया असावी अशी शंका कुणालाही येऊ शकते. हे मंकी आर्किड नावाप्रमाणेच माकडासारखे दिसते. कारण ते पाहिले की एखादे छोटे माकड मिस्कील हसतेय असाच भास होतो. प्रत्येक मोसमात हे फूल फुलते व त्याला नारंगीसारखा वास येतो.

Leave a Comment