उद्यापासून सुरू होणार एटीएम

arm
नवी दिल्ली – नागरिकांत शंभर रुपयांच्या नोटांमुळे एटीएमवर एकच गोंधळ उडत असताना नव्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा शुक्रवारपासून एटीएमद्वारे मिळणार असल्याचे अर्थमंत्रालयाने सांगितले आहे. शुक्रवारी नागरिकांसाठी एटीएमध्ये पैसे जमा होतील, असे अर्थ सचिव अशोक लावासा यांनी म्हटले आहे.

मंगळवारी रात्री ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याने व्यवाहारत १०० च्या नोटांचा तुटवडा जानवू लागल्याने एकच गोंधळ उडाला. दोन दिवस सर्व बँका आणि एटीएम बंद राहतील असे, केंद्र सरकारकडून अगोदरच सांगण्यात आले होते. एका व्यक्तीला एका एटीएम कार्डवरून १८ नोव्हेंबरपर्यंत दिवसभरात केवळ २ हजार रुपयेच काढता येतील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ती रक्कम वाढवून ४ हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.

Leave a Comment