बेहिशेबी रक्कम सापडल्यास भरावा लागणार २००% दंड

currency1
नवी दिल्ली: देशभरात पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद केल्यावर संभ्रम असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी येत असून या बातमीचा सर्वसामान्य व्यक्तिशी फारसा संबंध नाही. पण, ज्या मंडळींनी रोख स्वरूपात काळा पैसा साठवून ठेवला आहे आणि त्यांना तो बँकेत जमा करायचा आहे, अशा मंडळींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

सरकारची पुढील ५० दिवसातील बँक डिपॉझिटवर करडी नजर असणार असून, अडीच लाखांपेक्षा अधिक कॅश डिपॉझिट करायचा आहे अशा मंडळींना संबंधीत बँकेला पैशाचा स्त्रोत कळवावा लागणार आहे. तसेच, १० लाख रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी रक्कम सापडल्यास त्यावर बेहिशेबी मालमत्तेवर जितका कर भरावा लागेल तेवढी अधिकची रक्कम व त्यासोबत २०० टक्के दंडही भरावा लागेल. त्यामुळे अशा प्रकारची रक्कम जमा करताना काळ्या पैशांना आपोआप चाप लागणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळो बाजारपेठेत एकच धांदल उडाली आहे. त्यातच बँका आणि एटीएमही बंद असल्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढला आहे. सुट्ट्या पैशांवरून दुकानदार आणि ग्राहक यांच्यातही वादाचे प्रसंग घडले आहेत. यावर उपाय म्हणून अनेक छोट्या दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी दुकानेच बंद ठेवण्याचा निर्णय घेताल. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे प्रचंड हाल झाले.

Leave a Comment