या ठिकाणी चालतील पाचशे आणि हजारांच्या नोटा?

currancy2
मुंबई: केंद्र सरकारने देशातील काळ्यापैंशांवर सर्जिकल स्ट्राईक करत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. जनतेला विश्वासात घेऊन पंतप्रधान मोदींनी हा निर्णयही कळवला. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी या निर्णयाबद्धल आणि नोटा कशा व कोठे बदलता येतील याबाबत सांगितले. मात्र, तरीही अनेकांच्या मनात गोंधळ कायम आहे. म्हणूनच पाचशे आणि हजारांच्या नोटा कोठे चालतील याबाबत सविस्तर जाणून घ्या. येत्या शुक्रवारी, म्हणजेच ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून या नोटा (५०० आणि १०००) सरकारने ठरवून दिलेल्या अधिकृत ठिकाणीच स्विकारल्या जातील. त्याही काही मुदतीपर्यंतच.

दरम्यान, ५० दिवसांचा कालावधी हजार आणि पाचशेच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी देण्यात आला असून तत्काळमध्ये १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत बँक आणि पोस्ट खात्यात ओळखपत्र म्हणजेच पॅन कार्ड आणि आधार कार्ड सादर करून तुम्ही नोटा बदलू शकता. दरम्यान, सरकारने इतका मोठा निर्णय घेतला असला तरी, १००, ५०, २०,१०, ५,२ आणि १ रुपयांच्या नोटा आणि नाणे चलनात राहणार आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा सर्व प्रकारच्या सरकारी रुग्णालयांमध्ये , सरकारी रुग्णालयांमधील औषधांच्या दुकानांमध्ये, रेल्वेची तिकीटे काढण्यासाठी, राज्य सरकारच्या बस प्रवासाची तिकीटे काढण्यासाठी, एअरपोर्टवर वापरण्यासाठी किंवा विमानाची तिकीटे काढण्यासाठी, पेट्रोल पंपावर आणि सीएनजी पंपांवर चालतील. शुक्रवार, ११ नोव्हेंबर मध्यरात्रीपर्यंतच ही मुदत केवळ आहे. त्यानंतर वरील सर्व ठिकाणीही ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चालू शकणार नाहीत.

Leave a Comment