बँका शनिवारी, रविवारी देखील राहणार सुरू

rbi
नवी दिल्ली- बँका शनिवारी (दि. १२) व रविवारी (दि. १३) ग्राहकांच्या सोईसाठी सुरू राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. नव्या नोटांमध्ये कुठलीही चीप नसल्याचेही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे.

३० डिसेंबरपर्यंत दिवसाला ४ हजार रुपयांपर्यंतच्या नोटा तुमचे खाते असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत बदलून घेता येतील. रिझर्व्ह बँकेने त्यासाठी जारी केलेला अर्ज भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा अर्ज भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या अर्जाची गरज नाही. पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ नोटा बदलून घेण्यासाठीच ४ हजार रुपयांची ही मर्यादा असेल.

Leave a Comment