इतिहास चलनावरील बंदीचा

currancy1
नवी दिल्ली: मोदी सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाअंतर्गत आता ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या आहेत. ५० दिवसांचा कालावधी नागरिकांना या नोटा बदलण्यासाठी देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी या नोटा काही दिवस चालवण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र चलनातील मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय हा पहिल्यांदाच झालेला नाही आहे. याआधीही अनेकदा मोठ्या नोटा बंद करण्याचा निर्णय काही सरकारने घेतला आहे.

१ हजार, ५ हजार आणि १० हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय १९७८ साली मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. भारतात स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत म्हणजे १९४६पर्यंत १० हजार रूपयांची नोट होती. नंतर ती बाद करण्यात आली. १९४७मध्ये देश स्वतंत्र झाला व पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले. या सरकारने १९५४ साली १० हजार रूपयांची नोट पुन्हा चलनात आणली सोबतच ५ हजार रूपयांची नोटही चलनात आणली. १९७८पर्यंत या नोटा चलनात होत्या. मार्च १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांचे सरकार आल्यावर या सरकारने लगेच १९७८ मध्ये ५ हजार आणि १० हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment