३० टक्क्यांनी स्वस्त होणार घर?

home
मुंबई : सर्वाधिक काळ्या पैशांचा वापर घर खरेदी करताना होत असतो, म्हणून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा बंद झाल्याने सर्वाधिक फायदा नवे घर खरेदी करू इच्छीणाऱ्या लोकांना होणार आहे.

कारण काळा पैसा घरांच्या किंमती गगनाला भिडण्यासाठी जबाबदार आहे. जेव्हा आता कर्जाशिवाय इतर पैसा, ज्याचे कोणतेही अकाऊंट नाही, असा पैसा तयार होणारच नसेल, अशा पैशांची आवक थंडावल्याने नव्या घराच्या किमती या २० ते ३० टक्क्यांनी कमी होणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केल्यानंतर, नवीन घर घेणाऱ्यांचे व्यवहारही तुर्तास थांबले आहेत.

Leave a Comment