नव्या नोटेत नॅनो तंत्रज्ञान वापरल्याची अफवाच

2000
सध्याच्या चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा मंगळवारी मध्यरात्रीपासून बाद ठरल्या असल्या तरी नागरिकांच्या सोयीसाठी नव्या नोटा १० नोव्हेंबरपासूच चलनात येत आहेत.

नव्याने चलनात येणाऱ्या दोन हजारांच्या नोटेबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असून त्याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. त्यातूनच या नोटेमध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली गेली असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र रिझर्व बँकेच्या अधिकृत खुलाशानंतर ती अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुलाबी रंगाच्या या नोटेवर मागच्या बाजूस मंगळयानाची प्रतिमा आहे. रिझर्व्ह बँकेच्या नाशिकच्या छापखान्यात या नोटांची छपाई सुरू आहे. ही चीप सिग्नल परिवर्तनाचे काम करणार आहे व त्यामुळे ही नोट कुठे आहे, तिचा सिरीयल नंबर काय याची माहिती मिळू शकणार आहे. जमिनीखाली खोल १० मीटरवर जरी ती पुरली गेली असली तरी या तंत्रज्ञानामुळे ती शोधता येणार आहेच पण तिच्या आसपास असलेल्या अन्य नोटा बराच कालवधीसाठी तेथे असतील तर त्यांचीही माहिती कळू शकणार आहे. दोन हजार रूपयांच्या नोटेत असलेली जीपीएस यंत्रणा कोणत्याही प्रकारे नोटेतून बाहेर काढता येणार नाही; अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर झाडली. मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार नसल्याचा खुलासा शिखर बँकेने केला आहे.

नवी पाचशेची नोट हिरव्या रंगाची आहे. प्रथमच या नोटेवर ५०० हा आकडा हिंदीतून लिहिला गेला आहे व तिच्या मागच्या भागात लाल किल्ल्याचे चित्र आहे. दोन्ही नोटांवर नवे गर्व्हनर उर्जित पटेल यांची सही आहे व स्वच्छ भारत अभियानाचे चिन्हही आहे.

Leave a Comment