दिल्लीचे हवामान सेक्स लाईफसाठी घातक

fog
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीचे आरोग्य मुळात असलेल्या प्रदुषणात अचानक वाढ झाल्यामुळे धोकादायक स्थितीत पोहोचले असून दिल्लीवर गर्द धुके, धुर आणि आणि धूळीची चादर पसरली आहे. श्वास घेणेही दिल्लीकरांना मुश्किल झाले आहे. या प्रदुषणामुळे दमा, लंग कॅन्सर, ह्दयविकार या आजारांबरोबर लैंगिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. दिल्लीतील हवेमध्ये विषारी घटक मिसळल्यामुळे लोकांच्या लैंगिक कामक्रीडेच्या इच्छेवर परिणाम होत असल्यामुळे दिल्लीकरांची सेक्स लाईफही धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.

याबाबतचे वृत्त झी न्यूजने दिले असून या वृत्तानुसार, नागरीकांच्या लैंगिक जिवनावर हवाई प्रदुषणाचा भलताच परिणाम होतो. लोकांच्या कामक्रीडेमध्ये ३० टक्क्यांची घट होते. याला फर्टीलिटी तज्ज्ञांनीही दुजोरा दिला आहे. अनेक फर्टीलिटी तज्ज्ञांचे म्हणणे असे की, वायुप्रदुषणामुळे हवेमध्ये धातूच्या कणांचे प्रमाण वाढते. त्याचा शरीरातील हारमोन्सवर परिणाम होतो. महिलांच्या तुलने पूरूषांना याचा फटका अधिक बसतो. सध्यास्थितीत भारतामध्ये १५ टक्के पुरूष वद्यत्वाचा सामना करत आहेत. महिलांच्या तुलनेत हा आकडा मोठा असल्याचे आयव्हीएफ रुग्णालयाशी सेबंधित असलेल्या फर्टीलिटी तज्ञ सागरीका अग्रवाल सांगतात.

वायुप्रदुषणाचा शरीरामधील हार्मोन्स संतुलन आणि स्पर्मवर परिणाम त्याचप्रमाणे शरीरातील टेस्टोस्टिरोन किंवा ओईस्टोजेनचे प्रमाण कमी होत जाते आणि हे प्रमाण घटल्यामुळे संभोग करण्याची इच्छा कमी होते. अशा प्रकारच्या परिणामांचा सामना करावा लागू शकतो. या त्रासाचा फटका कमी बसावा यासाठी वेळीचा काही पावले उचलने महत्वाचे असते. त्यासाठी घरातून बाहेर पडताना तोंडाला मल्टी लेयर फिल्टर मास्क लावून बाहेर पडावे असा सल्ला सागरीका अग्रवाल देतात.