दर सहा महिन्यानी हे बेट बदलते देश

fijet-island
दर सहा महिन्यानी देश बदलणारे एक बेट पृथ्वीवर आहे हे फार कमी जणांना माहिती असेल. अटलांटिक महासागरापासून ६ किमी वर पूर्व फ्रान्स व स्पेनच्या सीमेवर असलेल्या नदीत हे फिजेंट आयलंड नावाचे बेट आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही नदी तिचा मार्ग बदलते मात्र ही नदीच फ्रान्स व स्पेनची सीमा आहे. या बेटाची मालकी सहा महिने फ्रान्सकडे तर सहा महिने स्पेनकडे असते व या बेटावर या दोन्ही देशातील लोक राहतात.

फ्रान्सचा लुई पंधरावा व स्पेनचा के फिलिप चौथा या दोघांच्यात या बेटासंदर्भात एक करार बेटावरच झाला. त्याअगोदर या बेटाचे दोन समान आकाराचे तुकडे दोन्ही देशांनी वाटून घेतले होते. मात्र १९५९ मध्ये झालेल्या करारानुसार हे बेट अखंड ठेवण्याचा व वर्षातील सहा सहा महिने त्याची मालकी बदलण्याचा निर्णय घेतला गेला. या कराराचे स्मारक बेटावर उभारले गेले आहे तसेच सत्ताबदल होताना येथे खास कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते.

Leave a Comment