८२ हजार कोटींच्या रक्षा सामग्री खरेदीला हिरवा कंदील

tejas
दिल्ली- भारत सरकारने संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेल्या रक्षा सामुग्री खरेदीला हिरवा कंदील दाखविला असून या अंतर्गत ८२ हजार कोटींची खरेदी केली जाणार आहे. यात १०० स्वदेशी फायटर जेट व ४०० टँक खरेदीचाही समावेश आहे. रक्षामंत्री मनोहर पर्रिकर यांनी या संदर्भात घेतल्या गेलेल्या निर्णयांना मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

या खरेदीत ८३ लाईट काँबॅट एअरक्राफट तेजस खरेदी केली जाणार असून हे विमान तेजस श्रेणीतील सर्वात छोटे सुपरसॉनिक फायटर प्लेन आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये ते तयार केले गेले असून खास हवाई दल व नौकादलासाठी त्याची निर्मिती केली गेली आहे. याशिवाय १५ लाईट काँबॅट हेलिकॉप्टर्स व ४६४ टी ९० टँकही खरेदी केले जाणार आहेत. गतवर्षी आक्टोबरमध्येच रक्षा खरेदी समितीने तिसर्‍या व चौथ्या पिनाक रेजिमेंटला मंजुरी दिली होती. यापूर्वी २० आक्टोबरला झालेल्या रक्षा खरेदी समिती बैठकीत अमेरिकेकडून १४५ अल्टालाईट होवित्झर आर्टिलरी गन्स खरेदीला मंजुरी दिली गेली आहे.

Leave a Comment