२०००ची नोट अद्याप गुलदस्त्यात

currancy
मुंबई – काळय़ा पैशावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील भारतीय रिझर्व्ह बँक २००० रुपयांची नोट आणणार आहे. गुलाबी रंगात ही नोट असणार आहे. ही नोट २०१७च्या दरम्यान बाजारात आणण्यात येईल असे वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आरबीआयने याविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

आरबीआय दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणण्यास इच्छुक असून ही नोट म्हैसुरमध्ये छापण्यात आली आहे. त्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच ही नोट बाजारात आणण्यात येणार आहे. या नोटवर आरबीआयचे नवीन गव्हर्नर उर्जित पटेल यांच स्वाक्षरी असणार आहे. ही नवीन नोट बाजारात कधी आणण्यात येणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती प्रकाशित करण्यात आलेली नाही.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठय़ा किमतीच्या नोटा बाजारात आणण्यास विरोध करण्यात येत आहे. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटांना खासकरून विरोध दर्शविण्यात आला आहे. या नोटा मर्यादित प्रमाणात बाजारात आणण्यात याव्यात असे म्हणण्यात येत आहे. या नोटांमुळे काळय़ा पैशाच्या व्यवहाराला चालना मिळते, बेकायदेशीर उलाढाली वाढतात आणि मध्यम किमतीचे व्यवहार करताना अनेक अडचणी येतात असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment