ब्लॅकबेरीचा शेवटचा स्मार्टफोन भारतात लाँच

black
ब्लॅकबेरीने त्यांचे लेटेस्ट अँड्राईड स्मार्टफोन डीटीईके ६० व डीटीईके ५० भारतात लाँच केले असून त्यातील डीटीईके ६० हा कंपनीचा शेवटचा स्मार्टफोन असल्याचे समजते. हे दोन्ही फोन नुकतेच अमेरिकेत लाँच केले गेले आहेत. हे दोन्ही फोन प्रथम दर्शनात अल्काटेल आयडॉल फोर एस सारखे आहेत व त्याच्या स्पेसिफिकेशनही तशाच आहेत. मात्र यात खास ब्लॅकबेरी सिक्युरिटी फिचर्स व डीटीईके ब्लॅकबेरी नावाचे अॅप दिले गेले आहे. हे अॅप फोनची ओएस व अॅप्स मॉनिटर करून युजरची प्रायव्हसी कधी धोक्यात आहे याची सूचना देते. या फोनना कस्टमाईजेबल ब्लॅकबेरी कन्व्हीनियन्सही दिले गेले आहे त्यामुळे व्हाईस कॉल सुरू असताना त्याचा म्यूट की सारखा वापर करता येतो.

डीटीईके ६० साठी ५ इंची एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले, ४जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज ते कार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, २१ एमपीचा बॅक तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस असून ती लवकरच नगेट ७.० मध्ये अपडेट करता येणार आहे. डीटीईके ५० हा सडपातळ असून त्याला ५.२ इंची एचडी डिस्प्ले, ३ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने टू टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. दोन्ही फोनसाठी बॅकसाईडला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. डीटीईके ६० ची किंमत ४६९९० रूपये तर ५० ची किंमत २१९९० रूपये आहे.

Leave a Comment