पेपर आणि मासिके विकून ‘आयआयटी’ उत्तीर्ण

iit
कानपूर : येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्माला आलेल्या एका होतकरू युवतीने पेपर आणि मासिकांची विक्री करून आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केले. तिच्या कष्टाने आणि जिद्दीने आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श प्रस्थापित केला आहे.

कानपूरमधील देहागावात राहणारी शिवांगी सरकारी शाळेत शिकत होती. शाळा सुटल्यानंतर ती तिच्या वडिलांसोबत पेपर आणि मासिके विकायची. हे सर्व करुन ती अभ्यासासाठी वेळ काढायची. शिवांगीने अशाच प्रकारे बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला एका दिवशी आनंद कुमार यांच्या ‘सुपर ३०’ याबाबत माहिती मिळाली आणि यानंतर तिचे आयुष्यच बदलले. शिवांगी तिच्या वडिलांसोबत आनंद कुमार यांना भेटायला गेली. शिवांगीची निवड ‘सुपर ३०’मध्ये झाली. शिवांगीने आयआयटी उत्तीर्ण केले आणि आता ती एका प्रतिष्ठीत कार्यरत आहे.

शिवांगीची कथा तिचे गुरु आणि सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार यांनी स्वत: जगासमोर आणली. आनंद कुमार यांनी फेसबूकवर शिवांगीच्या यशाची यशोगाथा शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता जशी शिवांगीला नोकरी लागल्याची माहिती आम्हाला मिळाली आम्हाला खूप आनंद झाला.

Leave a Comment