खतरनाक फोन नंबर

phonenum
देशविदेशातील अनेक हॉटींग किंवा झपाटलेल्या जागा, हॉटेल्स, घरे याबाबत आपण नेहमीच ऐकतो. मात्र झपाटलेल्या किंवा खतरनाक फोन नंबर बद्दल तुम्ही कधी कांही ऐकलेय? नसेल तर हे जरूर वाचा.

बुल्गेरियातील हा फोन नंबर सध्या अॅक्टीव्ह नाही कारण तो २००५ मध्ये सस्पेंड केला गेला आहे. हा नंबर आहे ०८८८८८८८८. या नंबरचा इतिहास सांगतो की ज्याने म्हणून हा नंबर घेतला त्याचे मरण ओढवले. अर्थात सरकारने अशा तीन घटना घडल्याबरोबर हा नंबर सस्पेंड करून टाकला कारण तो झपाटलेला मानला गेला. सर्वप्रथम हा नंबर मोबीटेक कंपनीचा सीईओ ब्लादीमीर गेसनोव्ह याच्याकडे होता. २००१ साली गेसनोव्ह कॅन्सरने मरण पावला. पण त्याचे जवळचे आप्त सांगतात की त्याच्या मृत्यूचे कारण वेगळेच होते मात्र कॅन्सरने तो मेला असे त्याच्या शत्रूंनी पसरविले.

त्यानंतर हा नंबर डिमेत्रोव याच्याकडे गेला. डिमेत्रोव हा कुख्यात ड्रग डिलर होता. २००३ साली त्याचा खून झाला तेव्हा हा नंबर त्याच्याजवळ होता. रशियन माफियांनी त्याचा गेम केला असेही सांगितले जाते. डिमेत्रोवचा ड्रग व्यापार ५०० दशलक्ष डॉलर्सचा होता. डिमेत्रोव नंतर हा नंबर व्यापारी डिसलिव्ह याच्याकडे गेला मात्र त्याचीही २००५ मध्ये हत्या केली गेली. हा य्यापारीही कोकेनचे ट्रॅफिकलींग करत होता असे म्हणतात. त्यानंतर मात्र सरकारने हा नंबर सस्पेंड केला असून आता तो कुणालाही दिला जात नाही.

Leave a Comment