धुक्यापासून बचावण्यासाठी…

fog
भारताच्या राजधानीला म्हणजे दिल्ली शहराला धुक्यांनी वेढा दिला आहे. आज हे संकट केवळ दिल्लीवर कोसळले असले तरी कधी ना कधी ते आपल्यावरही येऊन कोसळणार आहेच त्यामुळे अशा धुक्याने भारलेल्या वातावरणात त्याचा आपल्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून कोणते उपाय योजिले पाहिजेत आणि कशी पूर्व काळजी घेतली पाहिजे हे लोकांना माहीत असण्याची गरज आहे. कारण धुक्याच्या वातावरणाचा आपल्या विशेषतः लहान मुलांच्या श्‍वसनेंद्रियांवर विपरीत परिणाम होत असतो. तेव्हा लहान मुलांना धुक्यापासून दूर ठेवावे.

अशा शहरातून प्रवास करत असताना शक्यतो जेथे वाहतूक तुंबली असेल तेथे फारवेळ थांबणे टाळावे आणि थांबावेच लागले असेल तर आपल्या कारच्या काचा बंद कराव्यात. चेहरा आणि विशेष करून डोळे झाकले जातील. असा रूमाल तोंडावर बांधावा. गॉगलचा वापर करावा. बाहेरून घरात गेल्यानंतर तोंड स्वच्छ धुवावे, कपडे बदलावेत आणि धूर धुके नसलेल्या वातावरणात बसावे. लहान मुलांचे खेळण्याचे ठिकाण विषारी धुरापासून दूर असावे.

दाट लोकवस्ती आणि त्यातल्या कारखाने असलेली दाट लोकवस्ती घरासाठी वापरू नये. विरळ लोकवस्तीच्या आणि निव्वळ नागरी वस्ती असलेल्या कॉलनीमध्येच घर घ्यावे. चालत जायचे असल्यास वाहनांनी भरलेल्या मार्गावरून चालू नये. लहान मुलांना प्राणायाम करायला शिकवावे. क जीवनसत्त्व हे श्‍वसनेंद्रियांच्या विकारावर मात करण्यास कारणीभूत ठरणारे द्रव्य असल्यामुळे क जीवनसत्त्वाचा अधिक समावेश असलेले अन्नपदार्थ खावेत. गाजर, पालक, टमाटर यांचा वापर आहारात वाढवा. घरात एअर प्युरीफायर बसवावा. आता घराघरातून वॉटर प्युरीफायरचा वापर वाढला आहे. मात्र अजून लोकांना एअर प्युरीफायरची सवय झालेली नाही. ती वाढवावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment