वायरलेस स्मार्ट टेक्नॉलॉजी ठरू शकते धोकादायक

hack
स्मार्टफोन अथवा संगणकाच्या सहाय्याने व वायरलेस टेक्नॉलॉजीच्या वापराने उपयोगात येणारी स्मार्ट उपकरणे युजर्ससाठी धोकादायक ठरू शकतात हे संशोधकांनी सिद्ध केले आहे. ही उपकरणे हॅकर्स हॅक करू शकतात व त्यामुळे मोठ्या संख्येने युजर्सना धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा इस्त्रायलच्या तेल अवीव व्हिजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व कॅनडामधल्या हेलीफॅक्स येथील डलहौजी विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे.

आजकाल अनेक कंपन्या त्यांची उपकरणे स्मार्ट म्हणजे इंटरनेक्ट कनेक्टिव्हीटी सह पेश करत आहेत. स्मार्टफोन सोबतच स्मार्ट लॉक, स्मार्ट बल्ब अशी अनेक उपकरणे बाजारात आली आहेत.ही उपकरणे एकमेकांशी इंटरनेट ऑफ थिग्जच्या माध्यमातून कम्युनिकेशनसाठी उपयुक्त ठरतात. ती संगणक व स्मार्टफोनने कंट्रोल करता येतात मात्र या तंत्रज्ञानातील एक दोष संशोधकांना सापडला आहे. त्यासाठी त्यांनी फिलिप्सच्या एलईडी बल्बवर प्रयोग केले तेव्हा असे दिसले की हे बल्ब हॅक करून हॅकर्स प्रकाशाचा एक असा पॅटर्न बनवू शकतात ज्यामुळे युजर्सना फिटस येणे किंवा चक्कर येऊ शकते. स्मार्ट बल्ब प्रमाणेच स्मार्ट स्वीच, लॉक, थमोस्टॅट उपकरणांसाठीही हा धोका आहे.

हॅकींग करताना हॅकर्स आसपासच्या परिसरात असलेल्या इंटरनेट उपकरणांतही मालवेअर पसरवू शकतात व त्यामुळे एकाचवेळी मोठ्या परिसरातील उपकरण युजर्स त्याच्या त्रासात सापडू शकतात. अर्थात फिलिप्सने त्यांच्या बल्बमधील हा दोष दूर केला असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र भविष्यात या उपकरणांना हॅकींगचा धोका आहेच व परिणामी युजर्सनाही हा धोका आहे.

Leave a Comment