लेईकोने दिवाळी सेलमध्ये कमावले ३५० कोटी!

leeco
मुंबई: ऑक्टोबरमध्ये दिवाळी सेलमध्ये तब्बल ३५० कोटींची विक्री करुन एक मोठा विक्रम इंटरनेट आणि टेक कंपनी लेईकोने रचला असल्याची अधिकृत माहिती कंपनीने दिली आहे.

तब्बल तीन लाख स्मार्टफोन आणि हजारो टीव्हींची विक्री ऑक्टोबरमध्ये लेईकोने केली आहे. लेईको इंडियाचे ‘स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस’ अधिकारी अतुल जैन यांनी सांगितले की, ग्राहकांना त्यांनी खर्च केलेल्या पैशाची पूर्ण किंमत मिळावी असा आमचा प्रयत्न असतो. ज्यामुळे आमचे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रेरित करेल. तसेच ग्राहकांकडून मिळाणारा प्रतिसाद आणि प्रतिक्रियांबद्दल आम्ही खूप खुश आहोत.

दिवाळी दरम्यान, लेईकोने आपली अधिकृत वेबसाइट लेमॉलशिवाय अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ऑनलाईन शॉपिंग साइटवरुन मोठ्या प्रमाणात प्रोडक्टची विक्री करण्यात आली.

Leave a Comment