
मुंबई – बॉर्ड ऑफ वर्ल्ड फेडरेशन ऑफ एन्क्चेंजच्या (डब्ल्यूएफई) अध्यक्षपदी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई)च्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्ण यांची नेमणूक करण्यात आली. रामकृष्ण यांच्या नावावर कोलंबियातील कार्टाजेना येथे आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या सर्वसाधारण बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. जगभरातील २०० पेक्षा अधिक एक्स्चेंज आणि ‘सीसीपी’ची डब्ल्यूएफई ही संघटना आहे. दोन वर्षांनंतर तीन अधिकाऱयांची व्यवस्थापकीयपदी नेमणूक करण्यात येते.
चित्रा रामकृष्ण यांची डब्ल्यूएफई अध्यक्षपदी नियुक्ती
डॉ. अर्स रुगसेग्गर यांची उपाध्यक्षपदी, शिकागो एस्क्चेंज बोर्ड ऑप्शन एक्स्चेंजचे विल्यम ब्रोडस्की यांची स्थायी समितीच्या व्यवस्थापकीय प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांबरोबर काम करण्यास आपल्याला आनंद होईल असे रामकृष्ण यांनी म्हटले.
