स्थलांतरित होणार लिंकिंग रोडवरचा बाजार

fashion
मुंबई : लवकरच तरुणाईमध्ये शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेला वांद्र्यातील लिंकिंग रोडवरचा बाजार बंद होणार आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय रस्त्यावरील फेरीवाले आणि गिऱ्हाईकांच्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घेतला आहे.

लिंकिंग रोडवरचा बाजार लेटेस्ट ट्रेण्डचे फॅशनेबल कपडे आणि चपलांसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण मुंबईतून येथे खरेदीसाठी येतात. मात्र फेरीवाले, खरेदी करण्यासाठी आलेल्यांनी पार्क केलेल्या गाड्या यामुळे येथे कायमच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

एकूण ९७ स्टॉलधारक फॅशनेबल कपड्यांची दुनिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंकिंग रोडवर आहेत. तसेच अनेक अनधिकृत फेरीवालेही आहेत. यापैकी परवानाधारक फेरीवाल्यांना जवळच्याच पटवर्धन पार्क ट्रॅफिक आयलँडवर स्थलांतरित करण्यात येणार आहे.

Leave a Comment