शुक्राणू कमी करणारे इंजेक्शन विकसित

shukranu
महिलासाठी जसे अनेक गर्भरेाधक उपचार आहेत त्याचप्रमाणे पुरूषांसाठीही असावेत या उद्देशाने अमेरिकेतील वैज्ञानिकांनी पुरूषांसाठी सुरक्षित व प्रभावी असे इंजेक्शन तयार केले आहे. या इंजेक्शनचे दोन डोस आठ आठवड्यांच्या अंतराने दिले असता पुरूषांतील शुक्राणूंचे प्रमाण कमी होते असे दिसून आले आहे. परिणामी या पुरूषांपासून महिलांना गर्भधारणेची शक्यता कमी होते.

तयार करण्यात आलेले हे इंजेक्शन पत्नी अथवा मैत्रिणीच्या सहमतीनंतर २७० पुरूषावर वापरले गेले तेव्हा त्याची यशस्विता ९६ टक्के असल्याचे दिसून आले. त्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील पुरूषांचा प्रयोगात अंतर्भाव करण्यात आला होता. गेली वीस वर्षे पुरूषांसाठी असे उपचार शोधण्यासाठी संशोधन केले जात होते असेही समजते. इंजेक्शन देण्यात आलेल्या सर्व पुरूषांवर सहा महिने नजर ठेवली जात होती त्या काळात त्यांच्यातील शुक्राणूंचे प्रमाण १० लाखांहून कमी झाल्याचे आढळले. अर्थात या इंजेक्शनमुळे कांही जणांना मुरूमे येण्याचा अथवा कांही जणांना चिडचिड होण्याचा त्रास झाला. हे या इंजेक्शनचे साईड इफेक्ट असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे असून हे साईड इफेक्ट दूर करण्यासाठी आणखी संशोधन केले जाणार आहे.

Leave a Comment