या महालक्ष्मी मंदिरात दागिन्यांचा मिळतो प्रसाद

laxmi
ईश्वरावरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मंदिरात जाणारे भाविक देवाला फुले, फळे अथवा सोने चांदी व रोख रक्कम वाहताना नेहमीच आपण पाहतो. मात्र भाविकांकडून मिळालेले हे दान परत करणारे एक मंदिर मध्यप्रदेशातील रतलाम या गांवी आहे. रतलामच्या या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम प्रसाद म्हणून दिले जाण्याची प्रथा आहे. वर्षभर या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते मात्र असा प्रसाद दिवाळीच्या काळात भाविकांना दिला जातो व तो मिळविण्यासाठी दूरदूरच्या ठिकाणांहून भाविक येथे गर्दी करतात.

वर्षभर या मंदिरात येणार्‍या भाविकांकडून महालक्ष्मीला कोटयावधीचे दागिने, रोख रक्कम अर्पण केली जाते. धनत्रयोदशीपासून पुढचे कांही दिवस या मंदिरात कुबेराचा दरबार भरतो. म्हणजे वर्षभरात आलेले चढावे या काळात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये वाटले जातात या काळात या मंदिरात सोने, चांदी व नोटांच्या माळांची सजावट असते व कुणीही भाविक रिकाम्या हाती परतत नाही. मिळालेला हा प्रसाद भाविक खर्च न करता शुभ म्हणून सांभाळून ठेवतात. शेकडो वर्षांपूर्वीचे हे मंदिर आलेल्या दानाचा पूर्ण हिशोब दरवर्षी सादर करते. तसेच या मंदिरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व पोलिसांचा पहाराही ठेवला जातो.

Leave a Comment