ट्रंप होणार राष्ट्रपती- चिनी माकडाची भविष्यवाणी

monley
किंग ऑफ प्रोफेट म्हणजे देवदूतांचा राजा म्हणून चीनमध्ये लोकप्रिय बनलेल्या जेदा नावाच्या माकडाने दिलेल्या कौलानुसार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी डोनाल्ड ट्रंप यांची वर्णी लागणार आहे. पॉल आक्टोपस हा प्राणी जसा वर्ल्ड कप फुटबॉलच्या सामन्यांचे कौल देऊन प्रसिद्धीस आला होता. त्याचप्रमाणे हे जेदा माकड चीनमध्ये प्रसिद्धीस आले आहे. या माकडाने युरोपियन फुटबॉल २०१६ च्या स्पर्धेत पोर्तुगालच्या विजयाचे भविष्य वर्तविले होते व ते खरे झाले.

शियान्ह्यू टूरिझम पार्क मध्ये जेदाने अमेरिकन निवडणुकीचा कौल दिला तेव्हा त्याच्यासमेार रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप व डेमोक्रॅटिकच्या उमेदवार हिलरी किलंटन यांचे कटआऊट लावण्यात आले होते. पिवळा शर्ट घातलेल्या जेदाने ट्रंप यांच्या कटआऊटसमोर ठेवलेले केळे उचलले व त्यावरून त्याचा कौल ट्रंप यांना असल्याचे जाहीर करण्यात आले.

Leave a Comment