
मुंबई: १५ नोव्हेंबरला भारतात आपला नवा स्मार्टफोन V5 चीनी मोबाइल कंपनी विवो लाँच करणार आहे. मुंबईमध्ये विवो V5 स्मार्टफोनचा लाँचिंग इव्हेंट होणार असून २० ते २५ हजारांच्या या स्मार्टफोनची किंमत दरम्यान असू शकते.
१५ नोव्हेंबरला भारतात लाँच होणार २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन
याचा सेल्फी कॅमेरा या स्मार्टफोनची खासियत असून तब्बल २० मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींना हा स्मार्टफोन आकर्षित करु शकतो.
विवो V5 स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच फूल एचडी (१०८०×१९२० पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यात फ्रंट फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे. याचा सेल्फी
कॅमेरा २० मेगापिक्सलचा आहे. विवो V5बाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, गोल्ड कलरमध्ये हा स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही महिन्यापूर्वी विवोने आपला V3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली होती.
