स्टेट बॅंकेनंतर एचडीएफसी व आयसीआयसीआयनेही कमी केले गृहकर्जदर

home-loan
मुंबई – नवीन घर घेण्यासाठी कर्ज देणाऱ्या एचडीएफसी या गृहवित्त संस्थेने गृहकर्जाचा दर ०.१५ टक्के कमी केला असून आजपासून नवे दर लागू होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियानेही गृहकर्ज दर ९.१ टक्के केले आहे. गेल्या आठवड्यात, स्टेट बँकेने त्याच्या बेंचमार्क दरात १५ अंकांनी कपात केली होती.

गेल्या काही महिन्यात निधीच्या खर्चात घट झाल्याने याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी एचडीएफसीने कर्जदर कमी केले आहेत. यानुसार ७५ लाखांपर्यंतचे कर्ज महिलांना ९.१५ टक्के तर पुरुषांना ९.२० टक्के दराने पुरविले जाणार आहे. ७५ लाखांच्या वरचे गृहकर्ज महिलांना ९.२५ तर पुरुषांना ९.३० टक्के दराने दिले जाणार आहे.

खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने नव्या कर्जदारांसाठी गृहकर्जाचे दर ९.३० वरून कमी करून ९.१५ टक्के कमी केले आहे. ७५ लाख रुपयांपर्यंत महिलांसाठी ९.१५ टक्के दराने गृहकर्ज पुरविले जाणार आहे. एसबीआयच्या गृह कर्ज योजनेनुसार महिलासाठी बेंचमार्क दर प्रती २० टक्के म्हणजे ९.१ दर तर इतरांना ९.१५ टक्के दराने गृहकर्ज दिले जाणार आहे. हे दर फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१६ मध्ये मंजूर होतील.

Leave a Comment