या खुर्चीवर बसला तो यमाच्या दारी पोहोचला

khurchi
इंग्लंडच्या थर्कस संग्रहालयात कधी गेलात तर तेथे जमिनीपासून सहा फूट उंचीवर टांगलेली खुर्ची अवश्य बघा. अतिशय सामान्य वाटणारी ही खुर्ची शापित आहे असे येथील लोक सांगतात. या खुर्चीवर बसण्याचा मोह कुणालाही होऊ नये या उद्देशानेच ती जमिनीपासून उंच अंतरावर टांगली गेली आहे, कारण असे सांगतात की या खुर्चीवर जो कुणी बसतो तो मृत होतो.

थॉमस बस्बी नावाच्या माणसाची ही खुर्ची आहे. ती त्याची अतिशय आवडती होती व या खुर्चीवर अन्य कोणी बसलेय हे तो सहनच करू शकत नसे. १७०२ सालातली गोष्ट आहे. तेव्हा एकदा त्याचे सासरे या खुर्चीत बसले तेव्हा आपल्या खुर्चीवर कुणी बसलेय हे सहन न झालेल्या बस्बी ने सासर्‍याला ठार केले. या खुर्चीवर बसण्याची हिम्मत केलेल्या ६३ जणांना आत्तापर्यंत मृत्यू आल्याचेही सांगितले जाते.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात एका पबमध्ये ही खुर्ची ठेवली गेली होती. हॉट सीट असेच तिचे नामकरणही केले गेले होते. तेव्हा अनेकांच्या लक्षात आले की या खुर्चीवर जो कुणी बसतोय तो युद्धावरून परतच येत नाहीये. तेव्हापासून ही खुर्ची शापित मानली जाऊ लागली. खुर्चीचा मालक बस्बी हाही याच खुर्चीत बसल्यावर मरण पावला होता व त्यानेच जो कुणी या खुर्चीवर बसेल त्याला मरण येईल अशा शाप दिला असा समज आहे.

Leave a Comment