नव्या फीचर्स, लूकसह स्कोडा रॅपिड फेसलिफ्ट लॉन्च

skoda
मुंबई : रॅपिड सेडानचे फेसलिफ्ट मॉ़डेल स्कोडाने लॉन्च केले आहे. या कारची किंमत ८ लाख ३४ हजार रुपयांपासून ते १२ लाख ६४ हजार रुपयांपर्यंत आहे. स्कोडा रॅपिड फेसलिफ्टची ह्युंदाई वर्ना, होंडा सिटी, फॉक्सवेगन वेंटो आणि मारुती सुझुकी सियाज यांसारख्या कारना स्पर्धा असेल.

फॉक्सवेगन वेंटोच्या प्लॅटफॉर्मवर रॅपिड फेसलिफ्टला तयार करण्यात आले आहे. डिझाईनच्या बाबतीत अत्यंत शार्प आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रॅपिड फेसलिफ्टला स्कोडा ऑक्टाव्हिया आणि स्कोडा सुपर्ब यांच्या डिझाईनचाही थोडा स्पर्श झालेला आहे. मात्र, या कारच्या पुढील भागात अनेक बदल करण्यात आले आहेत. ग्रिल, प्रोजेक्टर हेडलँप्स आणि डे-टाईम रनिंग लाईट अत्यंत नव्या लूकमध्ये दिसतील. एअर डॅमवर हनीकॉम्ब डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. बाजूंना नवे अलॉय व्हिल्स लावण्यात आले आहेत. तर मागील बाजूस फार काही बदल करण्यात आले नाहीत. मात्र, टेललॅम्प्स, बंपर, विंग मिररसोबत इंडिकेटर आणि मजबूत एंटिना इत्यादी देण्यात आले आहे.

सध्याच्या रॅपिडसारखेच केबिन आहे. यामध्ये बेज-ब्लॅक कलरच्या थीमचा वापर करण्यात आले आहे. काही ठिकाणी ब्राऊन-बेज कलरचे कॉम्बिनेशनही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या कारमध्ये पुढील बाजूस हाईट अॅडजस्टेबल सीट, टिल्ट आणि टेलिस्कॉपिक अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हिल, सेंट्रल आर्मरेस्ट, टचस्क्रीन ऑडिओ सिस्टमसोबतच मिररलिंक, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वन-टच डाऊन ऑल पॉवर विंडो यांसारखे फीचर्स आहे. याशिवाय कारमध्ये मल्टी-इंर्फोमेशन डिस्प्ले देण्यात आला असून, मायलेजसोबत स्पीडची माहितीही मिळेल.

स्कोडा रॅपिड फेसलिफ्टमध्ये पॉवर स्पेसिफिकेशनबाबतही विशेष बदल करण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेल असे दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध असतील. डिझेल व्हेरिएंटमध्ये १.५ लीटरचे टर्बो चार्ज्ड इंजिन असेल, जो ११० पीएस पॉवर आणि २५० एनएम टॉर्क देईल. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १.६ लीटर इंजिन असेल, जो १०५ पीएस पॉवर आणि १५३ एनएम टॉर्क देईल. दोन्ही इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर असतील.

Leave a Comment