जवानांना व शेतकऱ्यांना आपली संपूर्ण संपत्ती दान करणार पुण्याचे प्रकाश केळकर

donate
पुणे – आपली संपूर्ण संपत्ती देशाच्या संरक्षणासाठी सिमेवर झटणाऱ्या जवानांना व शेतकऱ्यांना अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये कॉटन एक्सपर्ट म्हणून काम केलेल्या प्रकाश केळकर (७३) यांनी दान केली आहे. त्यांनी हा निर्णय आपल्या पत्नीच्या सहमतीने घेतला असून गुरूवारी रिटायर्ड होण्यापूर्वी त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात याचा खुलासा केला.

त्यांच्या दोन्हीही मुलींचा त्यांच्या या निर्णयाला पाठींबा आहे. या मृत्यूपत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनीही आमची संपत्ती देशाला दान केली आहे. यातील ३० टक्के रक्कम पंतप्रधान मदत निधीला, ३० टक्के रक्कम मुख्यमंत्री मदत निधीला, ३० टक्के रक्कम जवानांसाठी व १० टक्के रक्कम समाजोपयोगी काम करणाऱ्या एनजीओंना दिली जाणार आहे. ते व त्यांची पत्नी सातत्याने समाजसेवा करत असून मागच्यावर्षी त्यांनी ४० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना मदत केली होती.

Leave a Comment