शाओमीचा ६ जीबी रॅमवाला हायटेक स्मार्टफोन लाँच

xiaomi
मुंबई : नवा हायटेक स्मार्टफोन Mi MIX चिनी मोबाईल उत्पादक कंपनी शाओमीने लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स दिले असून हा स्मार्टफोन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

शाओमीच्या Mi MIXमध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले, क्वाडकोर क्वालमन स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर, ४ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल मेमरी, १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ६.० देण्यात आले आहे. ४जीबी रॅम/ १२८जीबी स्टोरेज फोनची किंमत ३४५०० रुपये असून ६जीबी रॅम/२५६जीबी स्टोरेज फोनची किंमत ३९५०० रुपये आहे.

Leave a Comment