फॉक्सवॅगनची पोलो जीटीआय भारतीय बाजारात दाखल

gti
मुंबई : भारतीय बाजारात फॉक्सवॅगन या जर्मन कंपनीने पोलो जीटीआय ही कार दाखल केली असून या कारची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही कार पोलो जीटी या कारची नवीन आवृत्ती असून यात १.८ लीटर टीएसआय इंजिन असणा-या या कारमध्ये ७ स्पीड डीएसजी गियरबॉक्स आहे. गाडीला ०-१०० किलोमीटर प्रतितास वेग घेण्यासाठी केवळ ७.२ सेकंद लागतात. या गाडीला ३ दारे आहेत. सिल्व्हर, व्हाईट, ब्लॅक आणि रेड या रंगात लिमिटेड एडिशनमध्ये उपलब्ध होणार ही गाडी पेट्रोल प्रकारात एक्स शोरुम मुंबईमधील किंमत २५.६५ लाख रुपये आहे.

या कारमध्ये पॉवर : १९२पीएस (१४१केव्ही), इंजिन प्रकार : १.८ लीटर ४ सिलिंडर, सर्वोच्च वेग : २३३ किलोमीटर प्रतितास, गियरबॉक्स : ऍटोमॅटिक ७ स्पीड, ५ प्रवासी जागा, पॉवर स्टिअरिंग, १०-१२ किलोमीटर प्रतिलीटर मायलेज ही गाडी देणार आहे.