सर्वात श्रीमंत पारसीत मिस्त्री प्रथम क्रमांकावर

misri
सध्या टाटा ग्रूप मध्ये ज्या कांही घटना घडल्या आहेत त्यावरून अनेक विवाद सुरू असतानाच टाटा व मिस्त्री हे दोघेही पारशी जमातीचे आहेत याकडेही लक्ष वेधले जात आहे. पारसी समाजाने देशाच्या अर्थ व उद्योग क्षेत्रात मोठेच योगदान दिले आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे. फोर्ब्सने भारतातील श्रींमत पारसी लोकांची लिस्ट नुकतीच जारी केली असून त्यात प्रथम क्रमांकावर टाटा नव्हे तर मिस्त्री आहेत. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकलेले सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री हे भारतातील सर्वात श्रीमंत पारसी उद्योजक आहेत. इंजिनिअरींग व कन्स्ट्रक्शन व्यवसायातील पालोनजी यांची मालमत्ता आहे ८९ हजार कोटी रूपये. टाटा सन्स मध्ये या कुटुंबाचा १८.४ टक्के हिस्सा आहे.

या यादीत दोन नंबरवर आहेत आदि गोदरेज. त्यांची मालमत्ता ८१ हजार कोटींची असून दरवर्षीचा महसूल आहे ३०हजार कोटी. तीन नंबरवर सिरम संस्थेचे सायरस पुनावाला आहेत. त्यांची मालमत्ता ५८ हजार कोटींची आहे व दरवर्षीचा महसूल ४५०० कोटींचा आहे. चार नंबरवर रतन टाटा आहेत. मात्र त्यांची मालमत्ता जाहीर केली गेलेली नाही. १०८ अब्ज डॉलर्सच्या या ग्रुपची नेट वर्थ माहिती नसली तरी टाटा ग्रुप विविध संस्था व ट्रस्ट द्वारे चालविला जातो व त्यात जेआरडी व रतन टाटा ट्रस्टचे शेअर्सही आहेत.

या यादीत पाच नंबरवर सायरस मिस्त्री आहेत त्यांच्या मालमत्तेसंदर्भातही काही माहिती दिली गेलेली नाही मात्र गेल्या वर्षात त्यांना पगार म्हणून १६.२५ कोटी रूपये मिळाले आहेत.

Leave a Comment