भारतीय वंशाच्या चहावालीला ऑस्ट्रेलियात उद्योजकता पुरस्कार

upmma-virdi
नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानच्या एका चहावाल्याचा बोलबाला होता. आता त्याबाबतीत भारत देखील कसा मागे राहील. दरम्यान भारतात चहा हा इंग्रजांनी आणला, पण ती चहा उत्तम प्रकारे फक्त भारतीयच बनवू शकतात. याच चहा बनवण्याच्या कलेमुळे एका भारतीय वंशाच्या महिलेचा ऑस्ट्रेलियात उद्योजकता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

२६ वर्षीय उपम्मा विरदी हेच चहा बनवण्याचे वेड तिला या यशापर्यंत पोहचवू शकले आहे. त्याचबरोबर उपम्मा विरदी ही एक वकील आहे. उपम्माला लहानपणापासूनच चहा बनवण्याची आवड होती. त्यात तिने ऑस्ट्रेलियात एक चहाचे दुकान सुरु केले. तिला माहीत होते की तिचा चहा ऑस्ट्रेलियातील नागरिकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. तिने बनवलेल्या चहाला ऑस्ट्रेलियन नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि बघता-बघता ऑस्ट्रेलियात चहावाली हा तिचा ब्रँड बनला. चहावाली नावाने तिने अवघ्या ऑस्ट्रेलियात आपल्या यशाचा झेंडा रोवला.

Leave a Comment