
नवी दिल्ली : रिलायन्स जिओकडून यूजर्सला फ्री डेटा सर्व्हिस मिळत असली तरी कंपनीकडे खराब नेटवर्कच्या अनेक तक्रारी येत असून कंपनीने या तक्रारीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल ४५,००० नवे टॉवर पुढील सहा महिन्यांत बसवणार असल्याची घोषणा कंपनीने केल्यामुळे कंपनी आपले ४जी नेटवर्क अधिक मजबूत कऱणार आहे.
जिओचे जाळे होणार अधिक मजबूत
जिओच्या यूजर्सची संख्या सतत वाढत चालल्यामुळे लोकप्रियता कमी होणार नाही या दृष्टीने कंपनीने ही घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कंपनी देशातील १८००० शहरांसोबतच दोन लाख गावांमध्ये टॉवर लावण्याची कंपनीची योजना आहे. पुढील चार वर्षात कंपनी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवे टॉवर लावण्याच्या योजनेतही ही गुंतवणूक असणार आहे.
