अॅपलचे नवे ऑफिस मार्चपासून कार्यान्वित होणार

apple
आपल्या कंपनीचे कार्यालय जगातील सर्वात मोठे कार्यालय असावे अशी इच्छा व्यक्त केलेल्या अॅपलच्या स्टीव्ह जॉब्जचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होत असून येत्या मार्चपासून कूपरटिनो कॅलिफोर्निया येथे उभारले जात असलेले अॅपलचे मुख्यालय कार्यान्वित केले जात आहे. या कार्यालयात एकावेळी १३ हजार कर्मचारी काम करू शकणार आहेत. हे कार्यालय केवळ आकारानेच मोठे नाही तर ते अत्याधुनिक व हायटेकही आहे.

apple1
हे चार मजली कार्यालय ३ हजार कर्व्ह ग्लासच्या सहाय्याने सजविले गेले असून या ठिकाणी लागणार्‍या विजेपैकी ७५ टक्के वीज येथेच निर्माण होणार आहे. स्पेसशीपचा भास होईल अशी या इमारतीची रचना आहे. कर्व्ह ग्लासच्या वापराने या इमारतीला अतिशय देखणे रूप आले आहे. ही ग्लास पातळ, अधिक चकचकीत व पारदर्शी आहे. इमारतीच्या बांधकामासाठी एकूण ५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम खर्ची पडली आहे. ओपन स्पेस एरिया ८३ हजार चौरस फुटांची आहे तर डायनिंग एरिया ६० हजार चौरस फुटांची आहे. येथे एकावेळी २१०० कर्मचारी जेवण करू शकतात. या परिसरात विविध प्रकारची १२०० झाडे लावली गेली असून त्यात अनेक फळझाडे आहेत. या झाडांची देखभाल करण्यासाठी माळ्याची गरज नाही कारण ते काम विशेष सेन्सर सिस्टीमने केले जाणार आहे. ही संपूर्ण इमारत भूकंपरोधी असून जपानी तज्ञांच्या खास मार्गदर्शनाखाली ती बनविली गेली आहे.

Leave a Comment