शहीद व सैनिकांचा सन्मान करणारे हॉटेल

hotel
देशाच्या सैनिकांसाठी अथवा शहीद व त्यांच्या कुटुंबियांसाठी आपलेही कांही योगदान असावे अशी भावना बहुतेक भारतीयांच्या मनात असते. देश व नागरिकांसाठी आपल्या प्राणांची बाजी लावणार्‍या या जिगरबाजांसाठी नागरिकांच्या मनात सन्मान असतो कारण सीमेवर ते देशाच्या रक्षणासाठी जीव तळहातावर घेऊन सज्ज असतात तर त्यांचे कुटुंबिय आपला जिवलग देशासाठी प्राण अर्पण करायला तयार आहे याचा मोठा अभिमान बाळगत असतात. हिमाचल मधील एका हॉटेलचालकाने त्याचे जवान व शहीदांबद्दलचे प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी अनोखा मार्ग स्विकारला आहे.

गोपाळ हॉटेल व रेस्टॉरंट हे हिमाचल प्रदेशातील हॉटेल या कारणामुळे आजकाल बरेच चर्चेत आले आहे. या हॉटेलने सैनिक व त्यांच्या परिवारासाठी प्रत्येक गोष्टीवर म्हणजे खाणे, पिणे, वास्तव्य यावर ५० टक्के सवलत दिली आहे तर शहीद जवानांच्या कुटुंबियांना या सर्व सुविधा मोफत देऊ केल्या आहेत. मालक सांगतात ही सुविधा आमच्या हॉटेलची जाहिरात व्हावी अथवा ग्राहकांना आकर्षित करावे म्हणून दिली गेलेली नाही तर आपल्या जवानांचा तसेच शहीदांचा सन्मान म्हणून दिली गेली आहे. त्यामागे जवानांचा हौसला वाढावा अशी इच्छा आहे. येथे गणवेशाशिवाय येणार्‍या सैनिकांना सर्व गोष्टींवर २५ टक्के सूट दिली जात आहे तर गणवेशात असणार्‍यांना ५० टक्के सवलत दिली जात आहे.

Leave a Comment