रशियात पार पडले सर्वात महागडे शाही लग्न

wedding
मॉस्को : जगातील सर्वात महागडे लग्न रशियाचे अब्जाधीश इलखोम शोकिराव यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे. मॉस्कोतील सर्वात अलिशान पार्क हॉटेलमध्ये लग्नाचे रिसेप्शन पार पडले. या शाही लग्नास तब्बल ९०० पाहुण्यांनी हजेरी लावली होती. लग्नात नवरीच्या ड्रेसची किंमतच तब्बल ४ कोटी २६ लाख रुपये होती. यावरुनच हे लग्न किती शाही असेल याचा तुम्हाला अंदाज येईल.

तब्बल १० फूट उंचीचा या लग्नातील केक होता. रिसेप्शनमध्ये आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजानासाठी तब्बल ३ कोटी १६ लाख रुपये खर्च करण्यात आले. इलखोम यांनी लग्नाचा सर्व खर्च केला आहे. इलखोम यांच्या उझबेकिस्तानमध्ये लक्झरी हॉटेल, शॉपिंग सेंटर्स आहेत.

Leave a Comment