मतदान केल्यावर हॉटेलिंगमध्ये मिळवा २५ टक्क्यांपर्यंत सूट

voting
मुंबई : मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीने शासनातर्फे येत्या स्थानिक स्वराज संस्थेत मतदान केल्यास तुम्हाला हॉटेलिंगमध्ये २५ टक्क्यापर्यंतची सूट मिळू शकते.

सरकारी किंवा खासगी हॉटेलमध्ये तुम्हाला मतदानाची खूण आणि आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर २५ टक्क्यांची सवलत मिळणार आहे. याबाबत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाणे पुढाकार घेत ही खास सवलत दिली आहे. अनेक जण निवडणुकांच्या दिवशी सुट्टीचा फायदा फिरायला जातात. त्यामुळे मतदानाच्या प्रमाणात घट होते. ही योजना मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी आखण्यात आली आहे. खास करुन शहरी लोकांनी गावाकडे जाऊन अधिकाधिक मतदानाचा हक्क बजवावा, असा हेतू यामागे आहे.

Leave a Comment