लेनोवोचा ४ कॅमेरेवाला फॅब २ सादर

lenovo
गुगलच्या टँगो प्रोजेक्टखाली चिनी मल्टीनॅशनल कंपनी लेनोवोने तयार केलेला लेनोवो फॅब २ हा अनोखा स्मार्टफोन १ नोव्हेंबरला लाँच करण्यात आला आहे. यूएस वेबसाईटवर तो ४९९ डॉलर्समध्ये उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनचे वैशिष्ठ म्हणजे त्याला चार कॅमेरे दिले गेले आहेत. त्यातील तीन कॅमेरा रिअर साईडला आहेत. यात १६ एमपीचा प्रायमरी,१ डेप्थ कॅमेरा व १ मोशन ट्रकींग कॅमेरा यांचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरा ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनला ६.१ इंचाचा क्यूएचडी २.५ कर्व्ह ग्लास डिस्प्ले दिला गेला आहे. ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रोकार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, क्विक चार्जिंग तंत्रज्ञानाचा वापर केलेली ४०५० एमएएचची बॅटरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment