भारतीय स्टार्टअपमध्ये चीनची मोठी गुंतवणूक

startup
भारतीय स्टार्टअप कंपन्यात चीनी कंपन्यांकडून होत असलेली गुंतवणक वाढती राहिल्याचे दिसून आले आहे.वेंचर इंटेलिजन्सच्या अहवालानुसार गेल्या दहा महिन्यात चिनी कंपन्यांनी भारतीय स्टार्टअप कंपन्यांत ८७ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गेल्या कांही वर्षात चीन व जपानी कंपन्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांत गुंतवणूकीस प्राधान्य देत आहेत मात्र सध्या जपानची गुंतवणूक कमी होताना दिसते आहे तर चीनची गुंतवणूक वाढत चालली आहे.

चीनी अलिबाबा, सॉफ्टबँक यांची भारतीय स्टार्टअपमधील गुंतवणूक सर्वाधिक आहे. मात्र गेल्या दोन वर्षात बेनोस पार्टनर्स, रेबराईट व्हीसी, डिजिटल गार्रेज, जीएमओ, सीट्रीप, हिलहाऊस कॅपिटल्स, शाओमी या कंपन्याही सातत्याने गुंतवणूक करत आहेत असे दिसले आहे.२०१५ मध्ये चीनी कंपन्यांनी सहा डील्स केली तर या वर्षात ही संख्या ७ वर गेली आहे. अलिबाबाने पेटीएम मध्ये केलेली ३० कोटींची गुंतवणूक ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. गेल्या वर्षभरात चीनने १३५.६ कोटींची गुंतवणूक केली होती. या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यातच ८७ कोटींवर गुंतवणक झाली असून बाकी दोन महिन्यात त्यात चांगली वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment