स्कोडाची नवी ऑक्टिव्हिया ९ इंजिन ऑप्शनसह लाँच

skoda
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी ऑक्टिव्हियाचे २०१७ मॉडेल नुकतेच जगप्रसिद्ध वाहननिर्माता कंपनी स्कोडाने लाँच केले. ९ इंजिन ऑप्शनचे फिचर्स या नव्या कारमध्ये देण्यात आले आहे. अत्याधुनिक असलेल्या तंत्रज्ञानात कोणताही विशेष असा बदल करण्यात आलेला नाही. सध्याच्या ऑक्टिव्हियासारखी ही नवी स्कोडा ऑक्टिव्हिया बनवण्यात आली.

या कारमध्ये फ्रंट एलईडी हेडलॅम्पस् आणि डीआरलीएस, आयत आकाराचे फॉग लॅम्पस्, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ९.२ इंच टच स्क्रीन देण्यात आले आहे. त्याचबरोबर १.८ लिटर टीएसआय आणि २.० लिटर टीडीआयसह ४ पेट्रोल आणि ५ डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

Leave a Comment