लाईफ एफ १ प्लसवर मिळणार एक वर्षासाठी मोफत ४जी सेवा

jio
नवी दिल्ली : लाईफ सीरिजचा एफ १ प्लस हा नवा स्मार्टफोन रिलायन्सने बाजारात आणला असून या स्मार्टफोनची किंमत कंपनीने १३ हजार ९९९ रुपये ठेवली असून या फोनवर एका वर्षासाठी ४जी सेवा मोफत मिळणार आहे.

अजूनही रिलायन्सच्या जिओ सेवेची क्रेझ पाहायला मिळत असून त्यातच हा स्मार्टफोन आणत रिलायन्सने स्मार्टफोन प्रेमींना दिवाळी गिफ्ट दिले आहे. या फोनमध्ये एचडी व्हॉईस कॉलसाठी खास सुविधा देण्यात आली आहे. स्नॅपडीलवर हा फोन सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून या फोनमध्ये ५.५ इंच आकाराची एचडी स्क्रीन, ६.० मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीम, १.६ ऑक्टाकोअर प्रोसेसर, ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज आणि १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment