गिरच्या जंगलाचा राजा राम गेला

ram
भारताच्या जंगलातील सर्वात वयोवृद्ध मानला गेलेला सिंह राम गीर अभयारण्यात शनिवारी मृतावस्थेत आढळल्याच्या वृत्ताला उपवनसंरक्षक राम रतन नल यांनी दुजोरा दिला आहे. राम हा सर्वात वृद्ध व सर्वात लोकपिय सिंह होता. तो १५ वर्षांचा होता व अतिशय देखणा व उमदा होता. सर्वाधिक फोटो काढले गेल्याचा मान रामला मिळाला होता असेही नल यांनी सांगितले.

आशियाई सिंहाचे जगातले एकमेव अभयारण्य असलेल्या गुजराथच्या गीर जंगलात राम व त्याचा भाऊ शाम यांनी अनेक वर्षे अक्षरशः राज्य केले होते. या अभयारण्यात आजमितीला ५००हून अधिक सिंह आहेत. रामच्या निधनाबद्दल आसपासच्या परिसरातील नागरिकांनीही शोक व्यक्त करून १ दिवसाचा दुखवटा पाळला असे समजते. रामच्या शरीराचे पोस्टमार्टम करण्यात आले तेव्हा त्याचा मृत्यू वयामुळेच झाल्याचे निष्पन्न झाले असेही नल यांनी सांगितले. ते म्हणाले राम गीरमधील अनेक बछड्यांचा पिता होता. त्याचा भाऊ शामही आता म्हातारा झाला आहे व जंगलच्या कायद्यानुसार आता त्यांची जागा युवापिढीतील नवीन सिंह घेतील.

Leave a Comment