राज ऑलिव्ह ब्रँड नोव्हेंबरमध्ये बाजारात

olive
राजस्थान सरकारने देशातले पहिले वहिले स्वदेशी ऑलिव्ह ऑईल बाजारात आणण्याची तयारी केली असून नोव्हेंबर मध्ये हे ऑईल राज ऑलिव्ह या ब्रँड नेमने बाजारात दाखल होत आहे. हे तेल साधारण ५०० ते ६०० रूपये किलो ने विकले जाईल असेही समजते. राजस्थान सरकारतर्फे ९ ते ११ नोव्हेंबर या काळात भरविल्या जात असलेल्या ग्लोबल राजस्थान अॅग्रो टेक मीटमध्ये हा ब्रँड लाँच केला जाईल.

इस्त्रायलच्या सहकार्याने राजस्थान सरकारने २००८ पासून ऑलिव्ह फार्मिग सुरू केले होते. त्यात सरकारच्या २०० हेक्टरवर तर शेतकर्‍यांनी त्यांच्या ५०० हेक्टर शेतजमीनीवर ऑलिव्ह फार्मिंग केले आहे. देशात ऑलिव्ह तेलाची मागणी सध्या १४ हजार मेट्रीक टनांची असून येत्या चार वर्षात ती २० हजार मेट्रीक टनांवर जाईल असे संकेत मिळत आहेत.बिकानेर येथे पहिली ऑलिव्ह ऑईल रिफायनरीही सुरू करण्यात आली आहे. सरकारतर्फे अॅग्रो टेक परिषदेत ऑलिव्ह ग्रीन टी ही सादर केला जाणार असून त्याचे प्रॉडक्शन लवकरच सुरू होत असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले. हा ग्रीन टी तुळस, जिंजर व लेमन अशा तीन स्वादात मिळणार आहे.

Leave a Comment