मिनी कुपरची कार्बन एस भारतात लाँच

minikupar
बीएमडब्ल्यूचा सबब्रँड असलेली मिनी कुपरची कार्बन एस एडिशन भारतात लाँच करण्यात आली आहे. या मॉडेलच्या फकत २० कार भारतात विकल्या जाणार आहेत. भारतात त्याच्या किंमती ३९ लाख ९० हजारांपासून ते ४१ लाख ५० हजारपर्यंत आहेत. या कारचे वैशिष्ठ्य म्हणजे ब्ल्यू टूथने कंट्रोल होणारी एक्झॉस्ट सिस्टीम. रिमोटने कमांड देऊन एक्झॉस्टचा व्हॉल्व्ह उघडता व बंद करता येतो व व्हॉल्व्ह उघडला की इंजिनचा दमदार आवाज ऐकता येतो. या शिवाय रेसिंग स्ट्रीप, स्टीकर्स, स्पोर्ट स्टीअरिंग व्हील लेदर कव्हर, १७ इंची अॅलॉय व्हील्स, जेसीडब्ल्यू बॉडी किटही दिले गेले आहे.

कारमध्ये ६.६ इंची स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम आहे तसेच टॉप मॉडेलसाठी ८.८ इंचाचे टचपॅड कंट्रोल,२.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिनही दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ही कार ६.५ सेकंदात घेतेच पण जगातील सर्वात छोटी पॉवरफुल कार म्हणून तिला मान्यता मिळाली आहे.

Leave a Comment