जगातले सर्वात सुरक्षित घर

ghar
अमेरिकेतील अध्यक्षीय निवासस्थान व्हाईट हाऊस अथवा अन्य मोठ्या देशातील प्रमुखांची निवासस्थाने ही जगातील सर्वात सुरक्षित घरे असतील असा जर आपला समज असेल तर तो चुकीचा आहे. अर्थात हे घर पाहायचे असेल तर पोलंड ला जावे लागेल.>सुरक्षा रक्षकांशिवायच जगात सर्वात सुरक्षित असे घर पोलंडच्या केडब्ल्यूके प्रोम्स या आर्किटेक्चरल फर्म ने तयार केले आहे.

ज्या व्यक्तीने हे घर बांधले आहे त्याची अपेक्षा आपले घर सर्वात सुरक्षित असावे अशी होती. अर्थात कोट्यावधी रूपये खर्च करून घर बांधणार्‍या प्रत्येकालाच आपले घर सुरक्षित असावे असे वाटत असते पण या माणसाने मात्र तशी अटच घातली होती. त्यानुसार केडब्ल्यूके प्रोम्स फर्मने या घराचा आराखडा तयार केला.फक्त १ बटण दाबले की हे घर चारी बाजूंनी क्राँक्रिट भिंतींनी बंद होते व एखाद्या भक्कम किल्याप्रमाणे ते दिसते. कितीही प्रयत्न केले तरी या घरात शिरणे शक्य नाहीच पण अणुबाँबचाही या घरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही असा कंपनीचा दावा आहे.

ghar1
किल्ल्याच्या रूपात असताना या घरात प्रवेश करायचा असेल तर दुसर्‍या मजल्यावर असलेल्या पुलावरून करता येतो पण तो मालकाची मर्जी असेल तरच. या पूर्ण घराभोवतीही भिंतींचे संरक्षण दिले गेले आहे. अर्थात घराचे इंटिरियर खूपच सुंदर असून ओपन मोडमध्ये त्यात हलणार्‍या वॉल्स, शटर स्लाईड करून उघडणार्‍या खिडक्या, स्विमिंग पूल अशा अनेक सुविधा आहेत.

Leave a Comment