केंद्र सरकार दूरसंचार विभागात सुसुत्रता आणण्यासाठी प्रयत्नशील

telecom
नवी दिल्ली – केंद्र सरकार दूरसंचार विभागात सुसुत्रता आणण्यासाठी प्रयत्नशील असून दूरसंचार विभागाने परवाने मिळवण्यासाठीची सोपी प्रक्रिया आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार सचिव जे.एस. दीपक याविषयी माहिती देताना म्हणाले की, आम्ही आता दूरसंचार विभागामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी, परवाने मिळवण्यासाठी सोपी प्रक्रिया करत आहोत. या सुधारणानेमुळे सेवांची गुणवत्ता वाढणार आहे. दूरसंचार विभाग आणि फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय दूरसंचार २०१६ या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते.

Leave a Comment