सोशल मीडियावर नेपाळच्या ‘भाजीवाली’चा धुमाकूळ

viral
काठमांडू – सोशल मीडियावर पाकिस्तानच्या निळ्या डोळ्यांच्या झळकलेल्या चहावाल्यानंतर आता नेपाळमधील एक ‘भाजीवाली’ने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.

नेपाळच्या एका स्थानिक मार्केटमध्ये भाजी विकताना या मुलीचा फोटो छायाचित्रकार रुपचंद्र महाराजन यांनी क्लिक केला. महाराजन यांनी तो फोटो इंटरनेटवर अपलोड करताच त्या मुलीच्या सौंदर्याने सोशल मीडियावर वादळच आले आहे. जो तो या मुलीच्या सौंदर्याचे कौतुक करत आहे. तिच्या सालस अदांचे वेगवेगळी रुपके देऊन कौतुक केले जात आहे.

तिचे एकूण दोन फोटो व्हायरल झाले आहेत. एका फोटोत ती भाजी विकत फोनवर बोलताना दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोत ती पाठीवर टमाट्यांची कॅरेट घेऊन एका पुलावरुन जाताना दिसत आहे. या मुलीचे नाव काय हे अद्याप कळू शकले नसले तरी तिच्यासाठी हॅशटॅग #tarkariwali हे ट्रेन्ड करत आहेत. अनेक लोक #tarkariwali हा शब्द वापरुन तिचा फोटो शेअर करत आहेत.

याआधी पाकिस्तानच्या अर्शद खान या निळ्या डोळ्याच्या चहावाल्याचाही फोटो असाच व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याला मॉडेलिंगचे ऑफरही मिळाले व त्याचे आयुष्य पालटून गेले होते. त्याचप्रमाणे या ‘तरकारीवाली’चेही नशीब असेच फळफळावे व तिला या कष्टाच्या जगण्यातून कायमची मुक्ती मिळावी अशी अपेक्षा इंटरनेट वापरकर्ते व्यक्त करत आहेत.

Leave a Comment